परीक्षेतले अपयश ही गंभीर बाब आहे. परंतु अपयश हा शब्दही सापेक्ष आहे. याहीपेक्षा वाईट घडू शकले असते. परंतु ‘अपयश’ याचा अर्थ माझ्या कपाळावर कायमचे गोंदवण आले असा नव्हे. आजपर्यंतच्या माझ्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये असे प्रथमच घडले हे खरे. यापुढे असे घडणार नाही अशी खबरदारी घेण्याची योजना आता आखायला हवी. अपयश ही समस्या जरूर आहे, पण त्यामुळे सारे आयुष्यच निरर्थक झाले आहे हे खरे नव्हे.
— डॉ. आनंद नाडकर्णी (स्वभाव-विभाव)