एखादा माणूस जेव्हा खूप मोठा होतो, इतका उंच की त्याच्या जवळच्या माणसांना त्याचे शिखर दिसूही शकत नाही तेव्हा त्याच्या सावलीत राहणार्या माणसांच्या आयुष्यांची थोडीफार परवड होणे अटळ असते. आणि त्याबद्दल तक्रार करण्यात अर्थ नसतो, कारण हे असेच व्हायचे असते. अशा आत्ममग्न, थोर माणसांचा समाजाकडून पराभव होतो, स्वतःच्या कुटुंबीयाकडून पराभव होतो, स्वतःच्या शरीराकडूनही पराभव होऊ शकतो. पण त्याने आपले ब्रीद न सोडता, त्याच्याशी तडजोड न करता वाटचाल चालू ठेवायची असते. त्यातच त्याची हिमालयीन उंची असते.
– डॉ. श्रीराम लागू (लमाण)
Leave a Reply