आता मात्र डॉक्टरांना त्या भाबड्या तरुणाची कीव आली आणि त्याला ते म्हणाले, ‘‘बेटा, काय सांगू तुला, तू मोठ्या श्रद्धेने इथे राहतो आहेस आणि कुणाच्याही श्रद्धेचा कधी भंग करू नये असे शास्त्र आहे; पण त्यागाशिवाय साधुजीवनाला अर्थच नाही. साधू जर त्याग न करता संग्रहच करायला लागले तर त्यांच्यात आणि सामान्य माणसात फरक काय ? आता तू इथल्या वातावरणाबद्ल म्हणतोस. तर तुला माहीत नसेल की गंगा ही भोगगंगा आहे. या गंगेचा इतिहास सगळा भोगाचा आहे. द्वापार युगात आणि आता कलियुगात सर्व प्रकारच्या भौतिक भोगांचे केंद्र कोणते असेल तर गंगा आणि त्यागाचं, वैराग्याचं कोणतं केंद्र असेल तर ते नर्मदा. अरे बेटा, अश्वत्थाम्याने सुद्धा त्याच्या शापित विजनवासासाठी नर्मदेची निवड केली. गंगेच्या काठी नाही राहिला तो.’’
— धनंजय देशपांडे (दिव्यस्पर्शी)
Leave a Reply