पुरुषांच्या विचित्र वागण्याचा मला बराच त्रास झाला आहे. शरीराची दुर्गंधी लपवण्यासाठी भाऊ वगैरे मला परदेशातून स्प्रे परफ्यूम आणून देत. माझ्या दोन्ही भावांना रेहानाच्या पतीनं परदेशात चांगली नोकरी मिळवून दिली होती. परदेशी साड्या पण खूप होत्या. ऑफिसमध्ये, बाहेर त्या साड्या आणि सेंटच्या सुवासानं पुरुष जवळ येत आहेत, हे लक्षात येताच मी माझ्या सर्व सुंदर परदेशी साड्या मैत्रिणींना देऊन टाकल्या. सेंट वापरणं बंद केलं. फक्त पांढरे कपडे वापरू लागले.
— नसीम हुरजूक (चाकाची खुर्ची)