किती मधुर स्वरमालांच्या लहरींवर लहरी त्या माडीतून बाहेर पडत होत्या, आणि सारे अंतराळ व्यापून टाकीत होत्या ! एक लकेर संपताच तिच्या पाठोपाठ दुसरी लकेर निघे, आणि पहिलीच्या रेंगाळणार्या मधुर ध्वनीत मिसळून जाई. श्रुतिमनोहर झंकारांची विलक्षण गर्दी होऊन गेली होती. जिकडेतिकडे दिव्य स्वरांची कारंजी फुटल्यासारखे झाले होते. कोठल्यातरी विस्तीर्ण उपवनातल्या असंख्य फुलवेली बहरल्या होत्या. कोठेतरी नानाविध सुगंधांचे घडेच्या घडे सांडले जाऊन त्यांचा परिमल आकाशात भिडून गेला होता. कसल्यातरी अवर्णनीय सुखसंवेदनेचे तरंग जिकडे तिकडे उठून त्यावर सारी सृष्टी हेलकावत होती.
— ना. सी. फडके
Leave a Reply