एका भारतीय माणसाच्या घरी गेलो होतो. सहज. तासभर मी तिथं असेन. मी भारतीय आहे म्हटल्यावर त्यानं एक व्याख्यान झोडलं. आपला देश, आपली परंपरा वगैरेबद्दल गळाभर बोलला. पण तो त्याच्या बायकोवर इतका खेकसत होता की विचारू नका. एकदा भारतीय माणूस आपल्या बायकोवर खेकसतो म्हणजे भारतीय समाज कसा बंडल आहे वगैरे मला अजिबात म्हणायचं नाही. पण इंडोनेशियात फिरताना त्या अनुभवाची मला मौज वाटली खरी.
— निळू दामले (इंडोनेशिया, स्त्रिया, लोकशाही)
Leave a Reply