एका मॉलसमोर मला उतरवण्यात आलं. मी विचारलं किती पैसे द्यायचे. कंडक्टर काय बोलला ते मला कळलं नाही. शेवटी त्यानं माझ्याकडून ३० हजार रूपये घेतले. ३० हजार इंडोनेशियन रूपये. मी ते दिले. कुठल्याही शहरात पहिलं पाऊल टाकताना असंच घडत असतं. मुंबई विमानतळावर उतरून दादरला जायचं म्हटलं तरी टॅक्सीवाला ५०० रूपये मागतो. बाहेरून आलेल्या माणसाला अंतराची कल्पना नसते, भाडी कशी असतात तेही माहीत नसतं.
— निळू दामले (इंडोनेशिया स्त्रिया लोकशाही)
Leave a Reply