नवखा माणूस बावळटासारखा इकडं तिकडं पाहात हिडतो. शहरातच वाढलेला माणूस आत्मविश्वासानं, स्वतःतच मग्न असल्यासारखा हिडतो. पेकन बारूचा रहिवासी बसच्या कंडक्टरला कुठं उतरायचं ते सांगत नाही. त्याचं ठिकाण आलं की ओरडून बस थांबवायला सांगतो आणि एक हजार रूपयांची नोट त्याच्या हातात ठेवतो. बावळट माणूस सापडला की कंडक्टरसहजच जास्त पैसे काढतो. होतलानबरोबर बराच भाग पायी हिडल्यानंतर ज्या ठिकाणी मी हिडणार होतो ती लक्षात आली.
— निळू दामले (इंडोनेशिया स्त्रिया लोकशाही)
Leave a Reply