‘ईहलोकात राहून ज्याची लॉयल्टी, श्रद्धा, बांधिलकी परलोकाशीस असेल त्यांनी शक्य तितक्या लवकर परलोकात गेले पाहिजे. त्यासाठी त्यास इतरांनी मदत केली पाहिजे.’ याच पारलौकिक वृत्तीमुळे हिदूंचे तेहतीस कोटी देव, ते कमी पडले म्हणून साधू, संत व गल्लो-गल्ली बुवा आहेत. हे सारे या देशाच्या पाठीशी असूनही हा देश आपल्या इतिहासात स्वतंत्र राहण्यापेक्षा अधिक काळ गुलामच का राहिला ? याचे मुख्य कारण असे आहे की, परलोकातील अगर स्वर्गातील देव सर्वांचा पिता असला तरी त्याची पृथ्वीवरील मुले मात्र एकमेकाशी कुणीच लागत नाही, पारस्पारिकता नाही, पारमार्थिक वृत्ती नाही. फक्त पारलौकिक भावनाच आहे.
— न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (सूर्योदयाची वाट पाहूया…)
Leave a Reply