शेवटी हे सारं त्याला असह्य झालं. त्याला वाटे, ‘मी इतका शिकलो सवरलो; ज्ञान मिळविलं; आणि ज्यांत कुणालाहि काडीचंसुद्धा ज्ञान मी देऊ शकत नाही असं शुद्ध हमालीचं काम मी करतो आहे ! हे माझेच देशबांधव खरे; पण यांच्या बेअकलीपणाची भित एवढी पुराणी अन् भक्कम की मी तिच्यावर रोजच्या रोज डोकं फोडून घेतलं आणि माझ्या अंतःकरणाच्या चिंध्या करून घेतल्या तरी गोष्ट त्यांच्या गावीदेखील नाही.’
– पर्ल बक (भित)