‘‘मजा तर खरीच !’’ परिचारकाला खूण करीत गुबगुबीत गृहस्थ म्हणाला, ‘‘पण त्यात दोष देण्यासारखं काही नाही. नुसते एका अधिकार्यानं पैसे खाऊन काय उपयोग ? दुसरे लोक पैसे खाणारच आणि त्यांना तो अधिकार नकोसा वाटणारच ! त्याला ते पाण्यात पाहणार ! ह्या जादा सद्गुणीपणामुळं त्याची वरची प्राप्ति तर बुडणारच; पण वरिष्ठ अधिकारीवर्गही त्याच्यावर असंतुष्ट राहणार, आणि आमच्यासारखाहि नाराज असणार. एवढहि करून खात्यात पाप व्हायचं ते होतच राहणार ! तेव्हा हा पैसा न खाणारा एखादा माणूस अखेर मिळवणार काय ?’’
— पु. भा. भावे (पाषाण )
Leave a Reply