आता अशा ह्या गोंधळात निभवायचं मोठं कठीण असतं. थोडक्यात म्हणजे मुलं सैरावैरा, फूटपाथवरच्या दुकानांच्या आसपास रेंगाळत जाणारी पुत्रवत्सला आणि तिकीट हरवायला आणि चेकर यायला गाठ पडल्यावर होणारा चेहरा घेऊन चाललेला पुरुष असा मेळा गिरगाव-ठाकूरद्वारच्या भागात अढळला की तो आमचा आहे हे ओळखावं ! म्हणून हे सगळं खिल्लार सांभाळीत कुठं जाणं नको होऊन जातं. कोलंबस भले अमेरिकेला जहाज घेऊन गेला असेल ! पण त्यास म्हणावं आमचा कुटुंबकबिला घेऊन एकदा विजयदुर्ग लायनीनं हणैंपर्यंत जाऊन दाखव ! हो !
— पु. ल. देशपांडे (असा मी असामी)
Leave a Reply