एक आश्चर्य म्हणजे इथल्या बाजारातले बहुसंख्य दुकानदार सरदारजीच आहेत. त्यांच्याकडून बरीच माहिती कळली. रणजितसिहानं जेव्हा काबूलवर स्वारी केली होती तेव्हापासून कितीतरी सरदारजी इथे आलेत. रणजितसिग तर नंतर माघारी गेला, पण त्याच्याबरोबर आलेले शेकडो शीख लोक इथे राहिले. ते व्यापार करू लागले, कोणी फळबागा लावल्या. पण मुख्यतः सगळ्यांनी व्यापार आणि सावकारी सुरू केली. इतकी वर्षे इथे राहूनही त्यांच्या राहण्यात, खाण्यात, बोलण्यात काहीही फरक पडलेला नाही. पंजाबमधला एखादा लहानसा सुभाच जणू इथे आहे.
–– प्रतिभा रानडे (अफगाण डायरी)
Leave a Reply