प्रतिभा रानडे (अफगाण डायरी)

ज्याचं अन्न खावं, त्याचा वाण नाही पण गुण ते अन्न खाणार्याला लागतो, असे म्हणतात. हे जसं व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे तसेच ते राष्ट्रांच्या बाबतीतही खरे आहे. आर्थिक गरिबी, सामाजिक जीवनातील कमालीचा मागासलेपणा, अशिक्षितपणा, गरीब-श्रीमंतांच्या मधली प्रचंड मोठी दरी, तरुणवर्गातील अस्वस्थता, राजकीय दिशाहीन गोंधळलेपणा अशी परिस्थिती ज्या देशात असेल तिथे परकीयांचे स्तोम माजायला वेळ लागत नाही. भरपूर आर्थिक मदत देणार्‍याचा मिधेपणा तर घेणारे राष्ट्र स्वीकारतेच, पण पाठोपाठ त्याच्या विचारप्रणालीतही फरक पडू लागतो. आणि हे घेणार्‍याच्या नकळत घडत असते.

– प्रतिभा रानडे (अफगाण डायरी)