प्रतिभा रानडे (अफगाण डायरी)

बादशहाखानांचा एक मुद्दा मात्र मला राहून राहून आठवतो. ते म्हणाले होते, ‘‘तुम्ही तर अफगाणिस्तानचा सगळा इतिहास वाचला आहे. तुम्हांला माहीतच आहे, पूर्वी इथे हिदू राजांचं राज्य होतं. मग कनिष्क राजाचं केवढं तरी बलाढ्य साम्राज्य होतं. तेव्हा आम्ही सगळेच बुद्धधर्मीय होतो. मग नंतर मुस्लिम इथं आले आणि आम्ही मुसलमान झालो. इस्लाममुळे जगातल्या इतर ज्ञानाचे सगळे दरवाजे आम्हांला बंद झाले म्हणून आम्ही असे मागासलेले राहिलो आहोत…आता हे डाव्या विचारांचे लोक सत्तेवर आलेत. बघुया त्यांच्या हातून तरी आमची सुटका होते का ते.’’

— प्रतिभा रानडे (अफगाण डायरी)