आयुष्याचा प्रवास संपवून मनुष्याने एकसष्टीच्या उंबरठ्यावर उभे राहणे, ही एक क्रांतिकारक अवस्था असते. याच वेळी जीवनाला एक विशेष स्थिरता आलेली असते. अर्धशतकापूर्वीच्या मानसिक दास्यातच जन्मलेल्या नि जगणार्या पिढीनेच ‘‘साठी बुद्धी नाठी’’ हा प्रवाद चलनी केला होता. विद्यमान महाराष्ट्राने त खोटा निबद्द ठरविला आहे. कर्तबगारीचा वसंत याच वेळी फुलारतो. पिकल्या हापूस आंब्याप्रमाणे विवेक आणि विचार यांना प्रगल्भतेचा गहिरा रंग चढलेला असतो. आचार, विचार, उच्चारांना न्याराच ठोसपणा आल्यामुळे, वरवर त्यांची तडफ जरी मंदावलेली दिसली तरी रातराणीच्या किवा तुळशी-मंजिरीच्या मुग्ध सुगंधासारखा त्यांचा विशेष जोरकस परिमल दरवळत असतो.
— प्रबोधनकार ठाकरे (वास्तवतेच्या चष्म्यातून आचार्य अत्रे)
Leave a Reply