त्या सतलजच्या प्रवाहाचा सतत चाललेला ध्रोंकार…रारंग ढांगातले दगड त्या ओघात पडल्यावर उसळणार्या पाण्याचा आवाज…पहाटेच्या वेळी पक्ष्यांची किलबिल, रात्री रातकिड्यांची किरकीर…मेघांचा गडगडाट…क्षणात चमकून जाणार्या विजेचा कडकडाट…कधी वार्याची भणभण…कधी नुसतीच पानांची सळसळ…आणि ह्या सर्वांपेक्षा अगदी वेगळाच एक आवाज. इथं येण्यापूर्वी कधी न ऐकलेला. हा आवाज शांततेचा !
– प्रभाकर पेंढारकर (रारंग ढांग)
Leave a Reply