साहित्याच्या अलौकिक सृष्टीत कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर ह्या नावाने कलाविहार करणार्या व्यक्तित्वाने आपल्या श्रेष्ठ प्रतिभा गुणांनी, असंख्य मने जिकून घेतली आहेत. लौकिक जीवनात तात्यासाहेब शिरवाडकर ह्या नावाने ओळखल्या जाणार्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वानेही आपल्या साहित्याइतका मोठा व तितकाच हवाहवासा वाटणारा ‘माणूस’ असा दुर्मिळ प्रत्यय या व्यक्तित्वातून येतो आणि साहित्यिक सहवासाइतकाच हा व्यक्तिगत सहवासही सुखावह होतो.
– प्रा. डॉ. बा. वा. दातार (दोन तात्या)