ज्ञानदेवाच्या सृष्टीत जे एकदा निर्माण झाले त्याला जीर्णत्व नाही व नाशही नाही. त्यांच्या कल्पनावृक्षांच्या बागेतली फुले कधी कोमेजत नाहीत की, कधी त्यांचा परिमळ कमी होत नाही. अशा पुष्पांची वाग्वैजयंतीमाला ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्राच्या गळ्यात घातली आहे.
– प्रा. म. सु. पाटील