आसपासच्या सर्व बर्यावाईट गोष्टींशी चटकन जुळते घेता येईल अशी तिची वृत्ती होती. भर दुपारी दुःसह उकाड्यात तिला गाढ झोप येत होती. धोधो पाऊस पडू लागला की, आपल्या क्वार्टर्सच्या आखुड आणि अरुंद व्हरांड्यात खांबाला टेकून ती उभी राहत होती. पावसाचे टपोरे थेंब आत्मसमर्पणाच्या अनावर आवेगाने तिच्या अंगावर झेप घेत होते. जीवनधारांचा तो शीतल स्पर्श झाला की, पाण्यात डुंबून पंख फडाडणार्या पाखरासारखे-आपले सपुलक अंग आनंदातिशयाने जागच्याजागी ती चळचळवीत होती.
— बी. रघुनाथ (कुत्रे)
Leave a Reply