त्या रात्री मी व्हाइसप्रिन्सीपालांच्या घरी गेलो. त्यांचा मोठ्ठा अल्सेशियन कुत्रा बाहेरच बसला होता. मी लांब उभा राहूनच विचार करायला लागलो. कुत्रा माझ्याजवळ येऊन हसत उभा राहिला. हसणारा अल्सेशियन किती भयानक असतो. मग त्यानं जरा पाठ फिरवली, तेव्हा मी घंटा वाजवली. मग कुत्रा पुन्हा फिरून माझ्या अंगावर हसत-हसत आला. सर आतून पहात असावेत. कारण कुत्र्यानं एक पंजा माझ्या कमरेवर ठेवला. तेव्हाच ते ओरडले, जॉनी, जॉनी. म्हणजे ह्याचं नाव जॉनी. मग अल्सेशियन गुपचुप कोपर्यातल्या जागेवर बसून पुन्हा माझ्याकडे हसत पाह्यला लागला.
– भालचंद्र नेमाडे (कोसला)
Leave a Reply