‘धनानंदानं बंदोबस्त केला आहे. पण तो अगदीच जुजबी ! त्यांचा आपल्या बलाढ्य सैन्यावर विश्वास आहे. पण त्या सैन्याला लढायची सवयच राहिलेली नाही ! आपले धनानंद महाराज अत्यंत भेकड आहेत. त्यामुळं ते स्वतः कुणाशीच लढणार नाहीत; आणि त्यांच्या सैन्याचा इतरत्र दबदबा असल्यामुळं दुसरं कुणी त्यांच्याशी लढणार नाही.’ चाणक्यानं म्हटलं, ‘तो भित्रा असल्यामुळंच तो कपटी होत गेला आहे. राजकारण्यांचा त्याला नेहमीच द्वेष वाटतो. म्हणूनच त्यांचा तो उपमर्द करतो !’ चंद्रगुप्त मधेच म्हणाला, ‘आचार्य, मला तर आता मुळीच धीर धरवत नाही. धनानंद महाराजांचे एकेक दुर्गुण ऐकले, म्हणजे संताप होतो….आपण पाटलिपुत्राकडे लगेच कूच करू या !’
— भा. द. खेर (चाणक्य)
Leave a Reply