आणि एवढ्यात चिमा बाहेर आली. तिनं बापाच्या येण्याच्या आधीचा आमचा संवाद ऐकला होता. ती बायकोच्या पुढं उभी राहून म्हणाली, ‘काकी, एवढी जड झाले मी तुला ! कशाला मग त्या दिवशी घरात घेतलंस ? कशाला माया लावलीस ? तूच मला उपदेश केला होतास ना, चांगलं वाग म्हणून ? मी चांगलं वागायचं ठरवलं होतं; पण म्हणून काय स्वतःला विकून घेऊ ? काकी, मला कळलं. मी चांगलं वागायचं ठरवलं तरी माणसं मला चांगलं वागू देणार नाहीत. अन् त्यातलीच एक तू ! मी नाही राहत तुझ्याकडे…मग मात्र मला म्हणू नकोस याच्याबरोबर का गेलीस अन् त्याचच्याबरोबर का नाचलीस…’
— महादेवशास्त्री जोशी
Leave a Reply