तिचे जीवन सांकळून राहिले होते. त्याला आता काही तरी निराळे वळण लागले. पण मधून मधून तिच्या हृदयीचा घाव उचकत होता. ती हताश होत होती. कपाळदुखी असह्य होऊन पडून राहात होती. माझ्या डोळ्यांचा जागता पहारा तिच्यावर असायचा. तिच्या प्रकृतीतला सूक्ष्मसा फरकसुद्धा माझ्या हृदयाच्या तबकडीवर नोंदला जायचा. अन् ती तशी गळून आहाळून गेली की हिने माझ्या अन् मी हिच्या तोंडाकडे पहात खिळून टाकल्यागत बसायचे अन् सुस्कारे सोडायचे.
– महादेवशास्त्री जोशी (जगावेगळं सासर)
Leave a Reply