‘एकच प्याला’ व ‘राजसंन्यास’ या दोन्ही नाटकांचे संकल्पन निखळ ट्रॅजिडीचे असले तरी त्या संज्ञेच्या खर्या अर्थाने त्या ट्रॅजिडीज आहेत की नाहीत, हा प्रश्न जिज्ञासूंनी जरूर विचारण्यासारखा आहे. त्या प्रश्नाच निःशंक असे समाधानकारक उत्तर शोधता वा देता येईल, असे वाटत नाही. याचे कारण म्हणजे गडकरी स्वतःच या उभय नाट्यकृतींच्या संबंधात भ्रांतचित्त होते.सुधाकर या अतिसामान्य व सहज मोहवश अशा माणसाची ट्रॅजिडी होऊच शकत नाही, हे गडकर्यांच्या लक्षात येऊन चुकले नसेल, असे तरी कसे म्हणावे ? कारण आरंभी रामलालच्या परिचायक निवेदनातून सुधाकरचे जे भव्योत्कट स्वभावचित्र प्रत्ययास येते, त्याचा साक्षात प्रत्यय प्रत्यक्षात मात्र सुधाकरच्या वर्तमानात कोठेच घडत नाही. ट्रॅजिडीच्या संकल्पनातील सुधाकरची मूर्ती प्रत्यक्षात आकार मात्र घेतच नाही. असे का व्हावे ?
— माधव मनोहर (गडकरीय ट्रॅजिडी)
Leave a Reply