या नव्या पिढीला जुन्या पोथ्या माहीत नाहीत. जुन्या संथा विहीत नाहीत. गाथा अवगत नाहीत. माथा सहजी लववत नाही. आग पेटली ना, की ती विझवली तरी पाहिजे किंवा पसरू तरी दिली पाहिजे. धुमसणे या पिढीला मंजूर नाही. प्रसिद्धी-यंत्रणेवर या पिढीचा विश्वास नाही. आग पेटली असताना ती पेटली आहे हे प्रसिद्ध करून काय होणार ? आग लावलेली नसतानाच ती लागली आहे, लावण्यात आली आहे, असं सांगून तरी काय साधणार ? आग पेटली असताना ती पेटलेलीच नाही असं सांगून तरी काय उपयोग ? म्हणून प्रसिद्धी-प्रचारावर आता विश्वासच राहिलेला नाही.
– मो. ग. तपस्वी (निवडक तपस्वी)