१९९० साली माझ्या आयुष्यातील ‘मुंबईपर्व’ संपलं. मी चित्रकला ‘व्यवसायातून’ निवृत्त व्हायचं ठरवलं होतं. मी पुण्यात आलो. माझ्या दृष्टीनं पुणे हे भीमसेनजींचं गाव होतं. चित्रकार गोपाळ देऊसकरांचं गाव होतं. नृत्य पंडिता रोहिणीताई भाटे यांचं गाव होतं. या तिन ज्येष्ठांपैकी माझा अल्पसा परिचय होता तो चित्रकार गोपाळ देऊसकरांशी. पुण्यात आल्यानंतर मात्र आमचा परिचय खूप दाट झाला. रोहिणीताई व भीमसेनजींशी परिचय जरी झाला नव्हता, तरी ही थोर मंडळी पुण्यात ‘आसपासच’ आहेत, ही भावना काय कमी होती ? त्यामुळे एक प्रकारच्या परिपूर्णतेच्या जाणीवेनिशी निर्मितीक्षम बेचैनीत राहायला मी शिकलो. पुण्यात आल्यानंतर १९९२ व १९९४ या वर्षी माझी दोन वैयत्ति*क चित्र प्रदर्शनं पुण्या-मुंबईत पार पडली ती या परिस्थितीत.
— रवी परांजपे (थोरांच्या आसपास)
Leave a Reply