त्यामुळे मी निवडलेल्या गुरुजन गणगोतातल्या कलावंतांचं माझ्या ‘आसपास असणं’ मला खूप महत्त्वाचं वाटू लागलं. त्या ‘आसपास असण्यानं’ माझ्यावरील निर्मितीक्षम जबाबदारीची जाणीव मला नेहमी सोबत करायची. ही सोबत मला एक प्रकारची ऊर्जा पुरवायची. अशी ऊर्जा पुरवणार्यांपैकी वॉल्टर लँगहॅमर मी ‘टाईर्म्स’ मध्ये पोचण्याआधी दोन-अडीच वर्ष तिथून निवृत्त झाले होते. दूर लंडनमध्ये स्थायिक झालो होते. पण ‘टाईम्स’ मध्ये मी असेपर्यंत त्यांचं नाव निघालं नाही, असा एकही दिवस गेलेला मला आठवत नाही. त्यांच्या चतुरस्त्र चित्र-कर्तृत्त्वांचा दरवळच तसा होता. मला निर्मितीची ऊर्जा पुरवायला, जबाबदारीची जाणीव द्यायला तो पुरेसा ठरला.
– रवी परांजपे (थोरांच्या आसपास)
Leave a Reply