ग. दि. माडगूळकरांवर समस्त मराठी रसिकवृंदानं अमाप प्रेम केलं. गद्य वा पद्य असो, त्यांच्या लेखनात मानवी जीवनाचा, संवेदनांचा मागोवा घेतलेला दिसतो. विचारवंत साहित्यिक पु. भा. भावे यांच्या शब्दात सांगायचं तर ‘‘वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते. माडगूळकरांपाशी ती दुर्मीळ दृष्टी आहे. ते नुसते आकाशाकडे पाहात नाहीत तर ‘आकाशतत्त्वाकडे’ पाहतात….’’ असा आकाशतत्त्वाकडे पहाणारा एक आभाळाएवढा प्रतिभावंत माणूस आम्हाला भेटला, त्याच्या सहवासानं, स्नेहानं आमचं आयुष्य पुलकित झालं …. ईश्वरानं अजून काय द्यायचं असतं ?
— राम गबाले (आमचे अण्णा)
Leave a Reply