आठवीत गेल्यापासून मात्र तिच्यात बदल झाला. मुलांबरोबर खेळणे तिने बंद केले. पण मुलींच्या बरोबर ती सगळे मैदानी खेळ खेळायची. अभ्यासातही तिची चांगली प्रगती होती. बारावीच्या परीक्षेत तर तिला इतके चांगले गुण मिळाले होते की तिला कोणत्याही शाखेत प्रवेश मिळाला असता. हे सर्व आठवून तिला खूप वाईट वाटत होते. आपल्याच नादात ती बसून होती. तिच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहात होते. बाईबाय तिच्या शेजारी येऊन केव्हाची बसली होती, पण ते तिच्या लक्षातही आले नव्हते. बाईबायने तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा ती एकदम दचकली. पदराने डोळे पुशीत तिने आपल्या सासूकडे पाहिले. बाईबाय तिला म्हणाली, ‘‘तुला अतिशय वाईट वाटणं अगदी स्वाभाविक आहे. त्याने असे वागायला नको होते. अगं, माझा मुलगा असला तरी त्याचे हे वागणे मला मुळीच पटत नाही !’’
— रा. का. बर्वे (ज्यो)
Leave a Reply