ले.- रवि बापट-शब्दांकन-सुनीति जैन (वॉर्ड नंबर पाच, केईएम)

पोलीस अधिकारी थक्क झाले. त्यातला एक तर चक्क म्हणालासुद्धा,-‘‘आज तुमचा दिवस आहे हे माहीत असतं तर आणलाच नसता तुला इथे.’’ आम्ही सारीच ज्येष्ठ मंडळी ड्यूटीवर असल्यामुळे दोन तासांतच सर्व तपासण्या होऊन जन्याचं ऑपरेशन झालं. त्याच्या आतड्यामध्ये ठिकठिकाणी भोकं पडली होती. छातीमध्ये रक्त साकळलेलं होतं. ऑपरेशनच्या वेळेस त्याची अवस्था अतिशय गंभीर होती. त्याच्या आतड्यांमधली भोकं शिवली. पोटातील रक्तस्त्राव थांबवला. छातीतील रक्तस्त्रावबाहेर यावा आणि फुफ्फुसाचे प्रसरण नीट व्हावं म्हणून छातीमध्ये एक नळी घातली. ती नळी बाहेर काढून णपवशीुरींशी डशरश्र च्या बाटलीला जोडण्यात आली.

— ले.- रवि बापट-शब्दांकन-सुनीति जैन (वॉर्ड नंबर पाच, केईएम)