वामन चोरघडे (विहीर)

बर्‍याच जणी पाणी भरीत होत्या. चाक नसलेली विहीर ती. पाणी ओढायचे झालेच तर वाकून ओढणे फक्त शक्य. प्रत्येकीच्या लुगड्याचा रंग निरनिराळा होता. पिवळा, खडी काढून रंगविलेला काळा, लालवट-पुष्कळ पुष्कळ रंग होते. पाणी ओढताना त्या खाली वाकत आणि त्या विहिरीची तोंडी झाकली जाई. दुरून पाहणार्याला वाटे जणू रंगीबेरंगी फुलाफळांनी लवलेल्या वेलींची चिरणच !!

— वामन चोरघडे (विहीर)