एखाद्या निर्जन बेटावर जाताना एकच काव्य बरोबर नेण्याचे जर माझ्यावर बंधन घालण्यात आले तर मी ‘मेघदूत’ या काव्याचीच निवड करीन असे मला वाटते. मेघदूतापेक्षा अधिक श्रेष्ठ दर्जाची काव्ये जागतिक वाङ्मयात उपलब्ध नसतील असे अर्थात मला म्हणायचे नाही. शिवाच्या मंदिरात शिव आणि केशवाच्या मंदिरात केशव हाच देवाधिदेव, असा प्रकार साहित्याच्या प्रांतास तरी करावयाचे काहीच कारण नाही. परंतु रसिकाच्या मनाला अथपासून इतिपर्यंत मंत्रमुग्ध करण्याचे, एक वेगळे भावविश्व त्याच्या सभोवार विणून त्याला उन्मनावस्थेत पोहोचविण्याचे सामर्थ्य मेघदुतात जितके आहे तितके अन्यत्र आढळणे फार कठीण आहे ….
— वि. वा. शिरवाडकर
Leave a Reply