त्या रंगद्रव्यांची बारीक पूड, तेल, पाणी इत्यादींच्या मिश्रणाने त्यांनी पक्के रंग बनविले. ते रंग लाकूड, कॅनव्हास इत्यादींवर फासून त्यांची परीक्षा केली. अखेर पुरी खात्री झाली तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना सार्या संशोधनाची, प्रयोगांची तपशीलवार माहिती दिली. ‘‘पैशा अभावी चर्च रंगवायचं राहून गेलंय. वेळेवर रंगसफेती झाली नाही तर आम्ही एवढं खपून उभं केलेलं चर्च वार्यापावसानं जमीनदोस्त होईल. ‘‘रंग इतका महाग आहे का ?’’ प्रा. कार्व्हरनी विचारलं. ‘‘काही काळजी करू नका. मी तुम्हाला उत्तम रंग पुरवतो.’’ डॉ. कार्व्हरनी आश्वासन दिलं.
– वीणा गवाणकर (एक होता कार्व्हर)
Leave a Reply