‘‘हो, आम्ही त्यांचे दुखणारे गुडघे का घेतले ? चार दिवसांकरिता घेतलेत. काळे, आम्ही असा विचार नाही करत. अहो एवढा मोठा कलावंत आहे, समाजाचं मनोरंजन करतो. तो कोणत्या समाजाचं मनोरंजन करतो ह्यावर काय अवलंबून आहे ? आपल्या वाट्याला नाही येत, म्हणून काय झालं ? तुमची दुखणी घेण्याची परमेश्वरानं आम्हाला जी देणगी दिली आहे, त्याचा उपयोग आम्ही समाजाची सेवा करण्याकडे करतो. चार दिवस तुमचं दुखणं घेतलं, बिघडलं काय ?’’
— व. पु. काळे
Leave a Reply