‘‘आणि गौरी, कदाचित फ्रेंच किवा जपानी लोकांची मदत घेऊन हा सुगंधही बाटलीत गिरफदार करता येईल. पण अमेरिकन मंडळींना आता सांगणार आहे तो सुगंध तर जीव गेला तरी निर्माण करता येणार नाही. ऐक. एक अंधारी खोली, मध्यभागी एक बाज, तेल लावून पडलेली तू, शेजारच्या गाठोड्यात एक चिमणी, बाजेखाली एक शेगडी. उदाधुपाचा वास. अंगाला विळखा घालून गाठोड्यातील चिमणी गाठोड्यासहित उचलायची. तेलाच्या आणि धुपाच्या वासात दमट दुपट्याचा नाव नसलेला ओलसर गंध. आपलं नाक, टोपड्याची गाठ जिथं गळ्यापाशी लगट करीत असते तिथं टेकवायचं. त्या सगळ्या संमिश्र सुगंधाचं अत्तर…’’
— व. पु. काळे (काही खरं काही खोटं)
Leave a Reply