तोच पाऊस आज वातावरणात दाटून राहिला आहे. कल्पनतेला पाऊस, पावसाआधीचा पाऊस. आपले पाऊसपण निखळ, विशुद्ध राखणारा; सार्या ऐहिक उपाधींपासून अस्पर्शित, अलिप्त असणारा पाऊस. तोच पाऊस मी झेलत आहे, देहावर नव्हे, तर देहापलीकडच्या मनावर, आत्म्यावर आणि या पावसाची ओळख आपण अद्याप विसरलो नाही या जाणिवेने कृतार्थ होत आहे.
— शांता शेळके (गुलाब, काटे, कळ्या…)
Leave a Reply