आता सार्या जगाचे एकदम दोन भाग केले जातात. एका भागात बाकीचे सगळे लोक आणि दुसर्या भागात आपण एकटे. तिथे आपलेच साम्राज्य असते अन् त्यात आपण अगदी सुरक्षित असतो. आपल्या या सार्वभौम साम्राज्यात वास्तव आणि कल्पनीय यांच्यामधल्या सीमा पार पुसून गेलेल्या असतात. भोवतालचे खरे जग बाहुल्यांच्या खेळासारखे खोटे, आभासमय वाटू लागते आणि कल्पनेचे जग अत्यंत खरेपणाने जाणवत राहते.
— शांता शेळके (गुलाब, काटे, कळ्या…)
Leave a Reply