यावर वार्याने ‘स्स’ ‘स्स’ करीत सात मजली हास्य केले ! एक आवंढा गिळून आंबा धीमेपणाने म्हणाला, ‘‘वायुराया, तू तरी माझ्यावर दया कर की !’’ अगदी घाबरून गेला होता आंबा ! ‘‘काय म्हणून मी दया करू ?’’ ‘‘जरा हळू पळ की माझ्यासाठी -’’ सारे प्राण एकवटून आंब्याने म्हटले. ‘‘का ? मन मानेल तसे पळणे हेच माझे काम आहे न् ते मला केले पाहिजे !’’ ‘‘माझे नाही ऐकणार तू ?’’ आंबा दीनवाणी बोलला. वार्याला आंब्याची कीव आली. त्याने आपला वेग कमी केला. आंब्याला हायसे वाटले व त्याने वडाकडे दृष्टीक्षेप टाकला – त्या वेळी वडराजा आंब्याकडे एक पारंबी फेकीत होता. आंब्याने त्या पारंबीला हृदयाशी धरले व वडाकडे कृतज्ञतेने पाहिले !
– शांतिलाल भंडारी (पारंब्या)