‘‘खरे सांगू का पोरी, मला ही तुझी प्रार्थनेची कल्पना फार आवडली. ज्या वेळी परिस्थिती बिकट होते, नाना दुःखे आणि चिता यांनी मन भांबावून जाते, त्या वेळी अशा एखाद्या निवांत ठिकाणी बसून देवाचं चितन करणं हा त्या दुःख, संकटावर मात करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. आयुष्यात माणसाला अनेकदा अवघड प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. पण त्यासाठीच देवावरच्या श्रद्धेवरची आवश्यकता आहे फार. अॅमी, माझ्या छोट्या मुली, या निमित्तानं तुला त्या श्रद्धेच महत्त्व कळलं हे फार चांगलं झालं !’’
— शान्ता शेळके (चारचौघी)
Leave a Reply