तथापि आमचा बहुतेक काळ भटक्यासारखाच जाई. बरेच दिवस उपाशी राहण्याचेही प्रसंग पडत. मूठभर दाणे भिजवून थोड्या मिठाबरोबर ते फाकण्याची पाळी येई. पांघरायला घोंगड्या अथवा दुसरी जाड वस्त्रे आमच्यापाशी मुळीच नव्हती. छत्रीचे तर नावच नको. सगळा प्रवास पायी नि अनवाणी. रात्र पडली म्हणजे रस्त्याच्या बाजूच्या एखाद्या झाडाखाली, पुलाच्या कमानीखाली, नाही तर चक्क उघड्या जागेवर आकाशाचे छत आणि जमिनीचा बिछाना करून विश्रांतीसाठी अंग टाकायचे. भीक मागायची नाही. दान घ्यायचं नाही असा रमाबाईंचा बाणा होता. जवळ पैसा नाही. फक्त होती विद्वत्ता. दोघांचेही लहान वय.
– सौ. ताराबाई साठे (अपराजिता रमा)
Leave a Reply