आकाशांतून चंद्राच्या शीतल किरणांप्रमाणेंच त्या तरुणीच्या मुखचंद्रांतून निघणार्या सुंदर ताना दशदिशा पसरत जाऊन नादब्रह्माच्या आनंदात सर्व सृष्टी डुलू लागली. सुगंधानें स्तिमित झालेला वारा एकदम जणू काय हा मधुर स्वरहि आपल्या ठिकाणीं साठवून ठेवू लागला, व त्यामुळे नादलुब्ध प्राण्यांप्रमाणे डुलूं लागला. आतापर्यंत अगदी स्तब्ध असलेल्या वृक्षलताहि डोलू लागल्या. तिच्या गायनाचे ते अत्यंत मधुर व स्पष्ट असे स्वर त्या कुंजवनात सर्वत्र सारखे भरत जाऊन सर्व जीवसृष्टि व जडसृष्टि जणू काय नादब्रह्माच्या आनंदांत बुडून अगदी तल्लीन झाली.
— ह. ना. आपट (वज्राघात)
Leave a Reply