गांवातली दोन माणसं समुद्र किनार्यावर फिरत होती. फिरताना त्यांना तिथं एक बोर्ड दिसला. त्यावर लिहीलं होतं,
“बुडणार्याला वाचवलेस ५०० रुपये बक्षिस”
पहिल्या माणसानं ते वाचलं आणि दुसर्याला म्हणाला,
“मी पाण्यात उडी मारतो मग तू मला वाचव. दोघं निम्मं निम्मं वाटून घेऊया”
दुसरा कायतरी बोलणार एवढ्यात पहिल्यानं पाण्यात उडी मारली.
पहिला–“आरं बघतोस काय, वाचव. मला पोहायलापण येत नाय”
दुसरा–आरं तु खाली काय लिहीलंया वाचलाच नाहीस—
“प्रेत काढणार्याला ३००० रुपये बक्षिस”
……
हाव लई बेकार