‘गण्या हॉस्पिटलमध्ये आहे. हात पाय दोन्ही फ्रॅक्चर आहेत.” मधू सांगत होता.
‘पण काल सायंकाळी तर नलिनीबरोबर मी त्याला हॉटेलमध्ये जाताना पाहिला. तेव्हा तर ठीक होता.’
दिनू म्हणाला. ‘हो पण तेव्हाच गण्याच्या बायकोनेही त्याला पाहिलं होतं ना !’ मधूने सांगितले.