1717

भुसावळ पॅसेंजरच्या डब्यात एक आडदांड माणूस चिंतोपंताच्या शेजारी येऊन बसला. त्याची एकूण देहबोली पाहून चिंतोपंत अजूनच आपले अंग चोरून बसले.

त्या इसमाने सिगारेट पेटवित म्हटले, ‘हे पहा, मी सिगारेट ओढणार आहे तुमची काही हरकत नाही ना ? असलीच तरी मला फिकीर नाही.’

तेव्हा चिंतोपंत म्हणाले,  ‘बाकी काही नाही पण सिगारेटच्या वासाने मला उलटी होते इतकेच !’