1719

एकदा एक इंग्रज व एक अमेरिकन माणूस दोघेही जेवावयास गेले. दोघांसाठी माशाचे तुकडे तळून देण्यात आले.
अमेरिकन माणसाने जेव्हा माशाचा मोठा तुकडा उचलला तेव्हा इंग्रज माणसाला खूप वाईट वाटले. तो थट्टेने म्हणाला, ‘आपण लोक शिष्टाचाराच्या खूप मोठमोठ्या गोष्टी करतो पण व्यवहारात मात्र आपण शून्य आहोत. मी तुझ्या जागी असतो तर स्वतहून लहान तुकडा घेतला असता.’
तेव्हा अमेरिकन माणूस म्हणाला,  ‘अरे, मग कशाला त्रास करून घेतोस ? छोटा तुकडा तर तुलाच मिळाला आहे !’