मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत पुढील प्रश्नोत्तरे झाली.
पत्रकार-“मुख्यमंत्री म्हणून दुष्काळाबद्दल तुमचे काय मत आहे ?”
मुख्यमंत्री – “काही नाही.”
पत्रकार – “शेतकऱयांच्या आत्महत्येबद्दल ?”
मुख्यमंत्री – “काही नाही.”
पत्रकार – “महिला कामगारांच्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणून तुमचे
काय निवेदन आहे?”
मुख्यमंत्री – “काहीही नाही.”
तेव्हा पत्रकार संतापून निघून जाऊ लागले. अन् मुख्यमंत्री म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणून माझं खरंच काहीही
सांगणं नाही कारण आत्ताच मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय !”