j-2876

राजाने एका कवीला आपली कविता ऐकवून अभिप्राय विचारला. “कविता काहीही जमली नाही” असे कवीने म्हणताच राजाला राग येऊन त्याने त्या कवीला एक दिवसाची शिक्षा दिली. काही दिवसाने राजाने त्या कवीला
बोलावून दुसरी कविता ऐकवली. आता तरी तो आपल्या कवितेला चांगलं म्हणेल असे राजाला वाटले पण कवी मात्र काहीही न बोलता चालू लागला. राजाने विचारले, “कुठे चाललात ?” “तुरुंगाकडे” कवी म्हणाला.