‘‘मिळते तर काय रे गड्या, मंगळाईस पुतळ्यांची माळ वाहिली असती. नेवाळीच्या माळांनी चातुर्मास भरला असता. माळरानात उघडा बसून अफ्तागिरी निर्मिली असती. पण गड्या रे, जासूदगिरी कठीण.’’ पोळीत भरलेल्या पुरणागत भितीचा साद, – भय वाटले, वाटतच होते. पण शब्दांचा भाव सही पुरणपोळीलगत खुशदिलाचा होता. मनीच म्हटले, ‘‘आता खंजीर गुलदस्तीच राहू दे. सुखाचे विचार घोळवीत काळाने झडपिले तर दुःख कसले ? संसाराची ब्याद वगळून जातानाही दुःख होतेच ! दुःख केव्हा होत नाही ? ते धोतर्याच्या फळासारखे चौफेर काटेरीच आहे.’’
— चि. यं. मराठे (बावनगुरुजी)
Leave a Reply