इतके दिवस खपून ह्या पहाडाला पाडलेली चीर मोठी केली, तिचा हा रस्ता झाला. पण अद्याप दुरून ती रारंग ढांगाला पडलेली एक फटच दिसते आहे. ह्या फटीच्या वरच्या बाजूला सगळ्या रारंग ढांगाचं वजन. हे दगडी छत किती काळ ते पेलू शकेल अशी शंका मनात निर्माण व्हावी आणि ह्या फटीत शिरताना जिवाचा थरकाप उडावा. काही ठिकाणी वरचं खोदलेलं दगडी छत इतकं खाली आलेलं की मोटारीतून जाणार्या माणसानं घाबरून, अभावितपणे आपलं डोकं खाली घ्यावं. काही ठिकाणी ते गाडीच्या टपाला लागेल म्हणून गाडी दुसर्या बाजूला घ्यावी तर जरा अंदाज चुकला तर एकदम सतलजमध्ये गाडी कोसळायची भीती.
— प्रभाकर पेंढारकर (रारंग ढांग)
Leave a Reply